एकाच भौगोलिक प्रदेशातील(शहर,गाव,वा त्याला जोडून असलेली खेडी किंवा जोडून असलेला प्रदेश) एकसारख्या वस्तुंचे उत्पादन करणा-या आणि समान संधी व दबावांना सामोरे जाण्या-या लोकांच्या समुहाला कामगार समुह म्हणतात.एका कारागीर समुहाची व्याख्या करायची झाल्यास, एकाच भौगोलिक प्रदेशातील(अधिक प्रमाणात गावं किंवा खेडयात) हस्तकला किंवा हातमागांच्या वस्तुंचे उत्पादन करणारे घरगुती समुह, अशी करता येईल. एक कारागीर समुह हा नेहमी एका पारंपारिक समुदायाशी संबंधित असतो आणि अशा स्थापित वस्तुंचे उत्पादन करणे हा त्याचा पिढीजात व्यवसाय असतो. आणि काही कारागीर समुह तर शतकांपासुन चालत आलेले आहेत.किनगाव कारागिर समुहासंबधी :-किनगांव येथील कारागीर समुह हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात येतात.किनगांव येथिल कारागीर समुह हे ६ पेक्षा जास्त कारागीर आणि १ SHGs तयार करु शकले आहेत आणि ते जास्त कामाच्या दबावाला सामोरे जायला मदत करत आहेत. लाभाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे.मातीची भांडी आणि वस्तु :-मुंबईतील धारावी आणि चंद्रपुर जिल्हातील भद्रावती ही दोन्ही ठिकाणं मातीच्या कलाकृती तयार करण्यासाठी एकमेकांना साहाय्य करण्यावर भर देत आहेत. ह्या दोन्ही ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या, रंगवलेल्या आणि काळ्या मातीच्या मनमोहक कलाकृती बनवल्या जातात. हातानी रंगवलेल्या ग्लेज टाईल्स सुद्धा बनवल्या जातात.भारतामध्ये मातीची भांडी आणि कलाकृती यांची एक समृद्ध परंपरा आहे आणि त्याची मूळे इतिहासपुर्व काळात आहेत.मातीच्या भांडयांना एक विस्तृत सर्वव्यापकता आहे आणि त्याची परंपरा पाच हजार वर्षा पुर्वी पासुन आहे. टेराकोटा कलाकृती च्या अत्यंत आकर्षक रुपामुळे, त्याला हस्तकलेला सुचलेले सुंदर काव्य असे म्हटले जाते. अनेक वैविध्यपुर्ण मातीच्या वस्तु बनवल्या जातात जसे, शोभेचे कंदील, सुरया, फुलदाणी,भांडी, संगीत वाद्ये, मेणबत्ती स्टैंड इत्यादी.जायचे कसे :-हवाईमार्ग:- नाशिकपासुन 185 किमी. दुर असलेले मुंबई हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. विमानतळाहुन तुम्ही बस स्टँड वर पोचण्यासाठी टँक्सी घेउ शकता.रस्तामार्गे:नाशिक हे मुंबईपासुन 185 किमी. दुर आहे आणि रस्तामार्गे अनुकुलरित्या जोडलेले आहे. पुणे – नाशिक महामार्ग हा शहरापासुन 220 किमी. दुर आहे. मुंबई/ ठाणे आणि नाशिक याच्यामध्ये पुष्कळ राज्यसरकारी आणि निजी बसेस उपलब्ध आहेत.रेल्वेमार्गे:-नाशिक हे मुंबईपासुन 185 किमी. दुर आहे आणि रस्तामार्गे अनुकुलरित्या जोडलेले आहे. पुणे – नाशिक महामार्ग हा शहरापासुन 220 किमी. दुर आहे. मुंबई/ ठाणे आणि नाशिक याच्यामध्ये पुष्कळ राज्यसरकारी आणि निजी बसेस उपलब्ध आहेत.