एकाच भौगोलिक प्रदेशातील(शहर,गाव,वा त्याला जोडून असलेली खेडी किंवा जोडून असलेला प्रदेश) एकसारख्या वस्तुंचे उत्पादन करणा-या आणि समान संधी व दबावांना सामोरे जाण्या-या लोकांच्या समुहाला कामगार समुह म्हणतात.एका कारागीर समुहाची व्याख्या करायची झाल्यास, एकाच भौगोलिक प्रदेशातील(अधिक प्रमाणात गावं किंवा खेडयात) हस्तकला किंवा हातमागांच्या वस्तुंचे उत्पादन करणारे घरगुती समुह, अशी करता येईल. एक कारागीर समुह हा नेहमी एका पारंपारिक समुदायाशी संबंधित असतो आणि अशा स्थापित वस्तुंचे उत्पादन करणे हा त्याचा पिढीजात व्यवसाय असतो. आणि काही कारागीर समुह तर शतकांपासुन चालत आलेले आहेत. उमेरती कारागीर समुहासंबधी :- उमेरती येथील कारागीर समुह हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात येतात. उमेरती येथिल कारागीर समुह हे 11 पर्यंत कारागीर आणि 1 स्वयं सहाय्ता सामुह तयार करु शकले आहेत आणि ते जास्त कामाच्या दबावाला सामोरे जायला मदत करत आहेत. लाभाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. गवत, केन, रीड आणि फायबर:- इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा गवत आणि पानांच्या विविध वस्तुंचे उत्पादन केले जाते. ही कला पुर्णपणे निर्सगापासुन उत्पन्न झाली आहे, यात कुठलेही रसायन नाही आणि पर्यावरणास अनुकुल आहे. बांबुची ताणण्याची उच्च ताकत आणि कोणत्याही आकारात मोडण्याची अनुकुलता हे गुण त्याला वास्तुकलासंबधी वापरासाठी उपयोगी बनवतात. कारागीर अनेक घरगुती वस्तु बांबुला आकार देउन बनवतात. जसे टोपल्या, तांदुळ आणि भाज्यांच्या चाळण्या आणि झाडु. अभिकल्पक वस्तु जसे फर्निचर, आलमारी हे लोकप्रिय आहेत. वांवुची एक विशेषता आहे, त्याला जास्त देखरेख करायची आवश्यकता नसते, वर्षातुन एकदा लाकडाचे पाँलीश मारणे हे वस्तुच्या दीर्घ आयुष्यासाठी पुरेसे असते. पामच्या नरम पानांपासुन तयार होणा-या कलाकृतीसाठी पहिले पानांच्या शिरा काढुन टाकतात आणि नंतर त्यांना उन्हात वाळवतात. यापासुन बनणा-या कलाकृतीमध्ये समावेश आहेः पिशव्या, जेवणाचे डबे, सजविलेले फोल्ड होणारे 37 ते 56 पाते असलेले हातपंखे. पाते हे त्यावर असलेल्या छिद्रांतुन तांब्याच्या तार घालुन एकत्र करुन बांधलेले असतात, आणि पसरविल्यावर पंख्यासारखे दिसावे म्हणुन, एकमेकांना जोडुन शिवलेले असतात. पंख्यांना आर्कषक बनविण्यासाठी त्याच्या पात्यांवर रंगानी फुलांचे नमुने काढतात. पामच्या पानांचे आणि बुंध्याचे विणकाम ही दक्षिण केरळात एक समृद्ध हस्तकला आहे. आज इथे बनविल्या जाणा-या वस्तु या देशीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठीही बनविल्या जातात. या हस्तकलेत बनविल्या जाणा-या वस्तु आहेत पिशव्या, टोप्या आणि पेटया इत्यादी. रीड हे बांबुसारखे दिसणारे एक सरळ उभे वाढणारे, पोकळ बुंध्याचे गवत आहे. ही एक मजबुत सामुग्री आहे आणि रीडच्या चटयांचा वापर करुन घराची भिंत आणि छप्पर बनवतात. रीडला समानांतर ठेउन चटई विणण्यापुर्वी पहिले त्याचे हवे त्या लांबीचे तुकडे करतात मग सोलतात. बनविण्याची सुरवात एका कोप-यापासुन करतात आणि तिरपे विणतात किंवा गुंफतात. लांब पटयांना मधुन दुमडतात आणि दुसरी iÍh आडवी तिरपी घालतात, आणि दुमडतात,आणि दुसरी परत आडवी तिरपी घालतात आणि हे सुरु राहाते. आडव्या तिरप्या पटयांच्या वळ्यामुळे चटईचे किनारे बनतात. वेळुचा वापर करुन खुप मजबुत टोपल्याही बनविल्या जातात. कच्चा माल :- महाराष्ट्रातील गांवे गवत, पाने, फायबर आणि रीडनी भरलेली आहेत. टोपल्या आणि संबधीत उत्पादनं बनविण्यासाठी गवत हे कच्चा मालाचे प्रमुख स्त्रोत आहे. दुसरा कच्चामाल जसे बांबु, केन, गवत, फायबर आणि रीड यांचाही उपयोग टोपल्या, छप्पर, दो-या, चटया आणि इतर खुप वस्तु बनविण्यासाठी होतो. प्रक्रियाः-: ज्युट फायबर हा ज्युट रोपाच्या बुंधा आणि बाहेरची साल यापासुन निघतो. फायबरचे प्रथम तत्व सडण्यापासुन मिळते. सडवण्याच्या प्रक्रियेत ज्युटचे बुंध्याचे बंडल एकत्र बांधतात आणि त्याला कमी हालचाल होणा-या साठवलेल्या पाण्यात डुबवुन ठेवतात. सडवण्याचे दोन प्रकार आहेत बुंधा सडविणे किंवा वरची साल सडविणे. सडवण्याच्या प्रक्रियेनंतर बांधलेल्या बंडलांना अनावृत्त करणे सुरु होते. बायका आणि पोरं सामान्यताः हे काम करतात. अनावृRr करण्याच्या प्रक्रियेत फाइबर नसलेला भाग घासुन काढुन टाकतात. नंतर कामगार ज्युटच्या बुंध्यातुन खोदुन आणि ओढुन फायबर काढतात. ज्युटच्या पिशव्यांचा वापर फँशनेबल पिशव्या आणि आपल्या दुकानाच्या जाहीरातीसाठी दुकानदार वापरत असलेल्या पिशव्या करण्यासाठी होतो. ज्युट पर्यावरण अनुकुल असल्यामुळे ते सामाजिक वापरासाठी आर्दश आहे. ज्युटचे फरशीवर टाकण्याचे विणुन बनलेले आणि कलगीदार आणि मखमली गालीचे. तसेच भारताच्या दक्षिण प्रदेशात ज्युटच्या सहजपणे विणल्या जाणा-या 5/6मीटर रुंदीच्या आणि तेवढ्याच लांबीच्या चटया आणि चटई बनविण्याचे सामान, मजबुत आणि सुंदर रंगछटेमध्ये आणि वेगवेगळ्या जाड गाठीचा, पनामा, हेरींगबोन, इत्यादी डिझाईन प्रकारानी विणुन बनविले जातात. भारतात केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्युटच्या चटया आणि कांबळे हे हातमाग आणि विद्युतमाग दोन्ही प्रकारने विणले जातात. पारंपारिक सतरंजी चटई ही घर सजावटीसाठी खुप लोकप्रिय आहे. न विणले जाणारे आणि मिश्रित ज्युटचा वापर गालिच्याचा खालचा भाग,लिनोलिअम अधःस्तर आणि इतर खुप कामासाठी होतो. अशाप्रकारे ज्युट हे अगदी बिजापासुन तर अगदी खराब झालेल्या, आयुष्य संपलेल्या फायबरपर्यत, सगळ्यात जास्त पर्यावरण अनुकुल फायबर आहे, कारण वापरुन खराब झालेले फायबर सुद्धा एकापेक्षा जास्त वेळा पुर्नरार्वतित करता येते. तांत्रिक बाबी :- प्रयोगात्मक अध्ययननाचे कार्य हे कारागीर समुहांना काम करण्याच्या पद्धतीमध्ये आधुनिकीकरणाची ओळख करुन देउन त्यांच्या कौशल्यात वाढ करुन त्यांची उत्पादकता आणि मिळकत वाढण्यासाठी त्यांना सक्षम करणे होय कि जेणेकरुन त्यांच्या जीवनातील कमीत कमी आधारभुत गरजा भागवण्यास ते समर्थ व्हावेत आणि गरिबीच्या पाशातुन एका पर्याप्त वेळेत बाहेर यावेत.
जायचे कसे :- हवाईमार्ग:-
मुंबई हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. ते गावापासुन 185 किमी. दुर आहे. नाशिक हे
रस्तामार्गे:- अनुकूलरित्या रस्तामार्गाने जोडलेले आहे आणि वाहतुक करणे आरामदायक आहे. तुम्ही नाशिकला बस किंवा टॅक्सीनेपण जाऊ शकता. रेल्वेमार्गे:-
मध्य रेल्वेमार्गावर नाशिक हे एक प्रमुख रेल्वेस्थानक आहे. शहराला राज्यातील इतर भागांशी जोडायला एका पर्याप्त संख्येत रेल्वेगाडया उपलब्ध आहेत. नाशिक ते मुंबई जायला सर्वात द्रुतगतीची रेल्वेगाडी पंचवटी एक्सप्रेस आहे जिच्याद्वारे शहरात पोचायला फक्त चार तास लागतात.