महाराष्ट्रा     नागपुर     ब्रम्हपुरी


एकाच भौगोलिक प्रदेशातील(शहर,गाव, त्याला जोडून असलेली खेडी किंवा जोडून असलेला प्रदेश) एकसारख्या वस्तुंचे उत्पादन करणा-या आणि समान संधी दबावांना सामोरे जाण्या-या लोकांच्या समुहाला कामगार समुह म्हणतात.एक कारागीर समुहाची व्याख्या करायची झाल्यास, एकाच भौगोलिक प्रदेशातील(अधिक प्रमाणात गावं किंवा खेडयात) हस्तकला किंवा हातमागांच्या वस्तुंचे उत्पादन करणारे घरगुती समुह, अशी करता येईल. एक कारागीर समुह हा नेहमी एका पारंपारिक समुदायाशी संबंधित असतो आणि अशा स्थापित वस्तुंचे उत्पादन करणे हा त्याचा पिढीजात व्यवसाय असतो. आणि काही कारागीर समुह तर शतकांपासुन चालत आलेले  आहेत.

 

ब्रम्हपुरी येथील कारागीर समुहासंबधी :-

 

ब्रम्हपुरी येथील कारागीर समुह हे महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यात येतात.

ब्रम्हपुरीतील कारागीर समुह हे 300 पर्यंत कारागीर आणि 25 स्वयं सहाय्ता सामुह तयार करु शकले आहेत आणि ते  जास्त कामाच्या दबावाला सामोरे जायला मदत करत आहेत. लाभाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे.

 

हातमागावरचा कपडा :-

 

महाराष्ट्रात कमीत कमी सहा वेगवेगळे हातमागावर कपडा तयार करण्याचे प्रकार आहेत, आणि सर्वांना ज्या खेड्यामध्ये त्यांचा उगम झाला आहे, त्याचे नाव मिळाले आहे, आणि सर्वाची स्वतःची एक अशी विशेष पद्धती आहे. प्रसिद्ध जामदानी ही निर्विवादपणे विस्तृत प्रकारांची राणी आहे, तथापि तिच्या असंख्य स्थानीक अवतारांनी तिचे मुळचे श्रेठत्व आणि विशेषज्ञता अबाधित स्वरुपात चालु ठेवली आहे.  मुळ स्परुपात ह्या कलेचा उल्लेख डाक्काई जामदानी असा करतात, यद्यपि आता ह्या कलेचा वापर करुन विविध उत्पादनं, उत्तर प्रदेशातील नवदीप आणि धात्तीग्राम येथे केली जातात.

 

डाक्काई जामदानी ही; खुप छान मलमल सारख्या संरचनेच्या आणि बहुश्रमसिद्ध सुशोभीत कारागीरीसाठी तिच्या उत्परिवर्ती चुलत्यामुळे  विख्यात आहे. बांग्लादेशीय विणकर इजिप्तचा चांगला कापुस वापरतात, तर भारतीय विणकर स्वदेशीय कच्चामाल वापरतात. सामान्यताः एका धाग्याच्या गुंडाळीच्या बाजुने खालुन आलेल्या दोन जास्तीच्या धाग्यांच्या विणीने सजवून विणले जाते. मुळ बांगलादेशी साडीचा जवळपास नेहमी एक फिक्कट भुरकट पृष्ठभाग असतो, पण भारतीय विणकर हे रंगसंगतीच्या पसंतीबाबत थोडे जास्त साहसी आहेत. अत्यंत तलम बारीक काळ्या जामदानीवर सर्व अंगभर आणि किनारीवर खुप वेगवेगळ्या रंगाची उधळण केलेले रेखीय किंवा फुलांचे डिझाईन्स मुक्तहस्तपणे विखुरलेले, आणि या सर्वावर कळस म्हणजे नजाकतीने डिझाईन करुन अलंकृत केलेला पदर पाहणे म्हणजे डोळ्यांना एक पंचपक्वानांची मेजवानीच असते.

 

डाक्काई जामदानी हा पुर्णतः समारंभीय पोशाख आहे, पण जामदानी चे अन्य प्रकार प्रामुख्याने फँशन अभिज्ञ कामकरी महिलांच्या औचित्यासाठी शोधले गेले आहेत. जामदानी डिझाईन्स जास्त प्रमाणात तंगाईल कपडयावर केले जातात, आणि सामान्यता भ्रमात टाकणा-या नामावली मुळे तंगाईल जामदानी म्हणुन यांची ओळख आहे. जरी फिक्कट भुरा रंग जास्त लोकप्रिय आहे, तरी इतर आकर्षक रंग आणि परवडणा-या किंमतीतही जामदानी उपलब्ध आहेत.

 

कच्चा  माल:-

 

1.        दोरा

2.       काँटन चा कपडा

3.       लाकडी ठोकळे

4.      रंग

 

प्रक्रियाः-

 

लोकर ही प्रत्येक वसंत ऋतुत गोळा केली जाते आणि त्याची कताई हाताने केली जाते. धागा हा सुत कातण्याच्या चाकावर, ज्याला स्थानीय भाषेत चरखा म्हणतात त्यावर कातुन तयार केला जातो. कातण्याच्या आधी, कच्च्या मालावर प्रक्रिया करतात, ताणुन ओढतात आणि स्वच्छ आणि मउ बनविण्यासाठी आणि घाण काढुन टाकण्यासाठी त्याला थोडे दिवस तांदुळाच्या पाण्याच्या मिश्रणात बुडवुन ठेवतात. हाताने कताई करणे हे फार परिश्रमाचे आणि वेळखाउ काम आहे. त्यासाठी खुप धीराची आणि सर्मपणाची गरज असते, आणि ही प्रक्रिया पाहतांना विस्मय वाटतो.   

 

हा धागा खुप नाजुक असल्याने विद्युत मागाने होणा-या कंपनामुळे तुटु शकतो, त्यामुळे शाली या 100% पारंपारिक हातमागाने विणल्या जातात. उत्कृष्ठ कपडा तयार करण्यासाठी विणकराला एकसारखा हात वापरणे जरुरी आहे. विणकाम हे धागे भरणी ने भरुन केले जाते. कपडा विणण्याची प्रक्रिया ही सुद्धा एक कला आहे, जी पिढयान पिढया हस्तांतरीत होत आलेली आहे. हातमागावर एक शाल विणायला जवळपास चार दिवस लागतात.

 

रंगवणेसुद्धा हाताने आणि प्रत्येक तुकडा एक एक वेगळा करुन रंगवला जातो. शालींना रंगवणार-या रंगा-यांना पिढ्यांचा अनुभव आणि खुप संयम असतो, एका छोटीशी चुक सुद्धा उत्पादनाच्या गुणवत्तेत फरक आणते. शालींना पर्यावरण अनुकूल बनविण्यासाठी केवळ धातु आणि एझो – मुक्त रंग वापरला जातो. पृष्ठभागाच्या आतपर्यंत रंग जावा म्हणुन शुद्ध पाणी उत्तेजीत करण्यासाठी वापरले जाते. रंगवण्याचे काम पाण्याच्या उत्कलन बिंदुपेक्षा थोडी कमी उष्णता असलेल्या तापमानात तासभर केले जाते. पशमीना लोकर ही अपेक्षेबाहेर शोषुन घेणारी, आणि सहजतेने आतपर्यंत रंगणारी आहे.   

 

तांत्रिक बाबी :-

 

जामदानीमध्ये डिझाईनची संरचना पेपरवर काढली जाते आणि पेपर गुंडाळलेल्या धाग्यांच्या मागे नेने टाचला जातो. जसे जसे विणण्याचे काम पुढे जाते, तसे तसे डिझाईन चे काम भरतकामासारखे केले जाते. जेव्हा मागावर विणलेला धागा डिझाईन नुसार जिथे फुल किंवा आकृती टाकायची आहे त्याच्या जवळ येतो, तेव्हा विणकर डिझाईनच्या रंगानुसार ठरवलेल्या रंगाचा धागा गुंडाळलेल्या बांबुची सुई त्या जागेत घुसवितो. जसा जसा प्रत्येक मागावर विणलेला धागा किंवा लोकरीचा धागा ळीजवळून जातो, तो डिझाईन घातलेल्या भागातली एक किंवा दुसरी सुई जशी गरज असेल तशी, टाके घालुन बंद करतो, आणि ही प्रक्रिया  डिझाईन पुर्ण होईस्तोवर सुरु राहते. जेव्हा डिझाईन हे सतत आणि नियमित सारखे असते, तेव्हा सामान्यतः निपुण विणकर ते पेपरवरचे मदतगार डिझाईन दुस-याला देतो.

 

जायचे कसे :-

 

नागपूर हे शहर, भारताच्या भूभागावर जवळपास मध्यभागी असल्यामुळे,  एका विस्तीर्ण रस्तेमार्गाच्या जाळ्यांनी नागपूरला महाराष्ट्रातील इतर शहरांशी आणि भारताशी जोडलेले आहे. विवध महत्वाची पर्यटन स्थळे जसे औरंगाबाद (504 किमी.), खजुराहो (546किमी.), भोपाळ (352किमी.) आणि  कान्हा (266किमी.) हे नागपूरशी रस्तेमार्गाद्वारे जोडलेले आहेत. नागपूर शहरात रेल्वे स्टेशन आहे. नागपूरच्या मध्यवर्ती स्थानामुळे नगपुर रेल्वेस्टेशन, एक महत्वाचे रेल्वे जंक्शन म्हणून उदयास आले आहे. नागपूर दक्षिण – पुर्व आणि मध्य रेल्वे यांना जोडणारे रेल्वे जंक्शन म्हणून काम करते. पुष्कळ प्रमुख रेल्वेगाडया नागपूर रेल्वेस्टेशनावर थांबतात. देशातील कुठल्याही भागातून नागपूरला पोहचता येते.

 

 

 

 

 








महाराष्ट्रा     नागपुर     राष्ट्रीय विकास खादी ग्रामोद्योग संस्था