एकाच भौगोलिक प्रदेशातील(शहर,गाव,वा त्याला जोडून असलेली खेडी किंवा जोडून असलेला प्रदेश) एकसारख्या वस्तुंचे उत्पादन करणा-या आणि समान संधी व दबावांना सामोरे जाण्या-या लोकांच्या समुहाला कामगार समुह म्हणतात.एका कारागीर समुहाची व्याख्या करायची झाल्यास, एकाच भौगोलिक प्रदेशातील(अधिक प्रमाणात गावं किंवा खेडयात) हस्तकला किंवा हातमागांच्या वस्तुंचे उत्पादन करणारे घरगुती समुह, अशी करता येईल. एक कारागीर समुह हा नेहमी एका पारंपारिक समुदायाशी संबंधित असतो आणि अशा स्थापित वस्तुंचे उत्पादन करणे हा त्याचा पिढीजात व्यवसाय असतो. आणि काही कारागीर समुह तर शतकांपासुन चालत आलेले आहेत. संभाजीनगरा कामगार समुह –: संभाजीनगर कारागीर समुह हे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात येतात. संभाजीनगर कामगार समुहाने 300 पेक्षा जास्त कारागिर आणि 18 स्वयं सहाय्ता सामुह तयार केले आहेत आणि ते जास्त कामाच्या दबावाला सामोरे जायला मदत करत आहेत. लाभाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. टेराकोटा – मातीच्या कलाकृती:- मुंबईतील धारावी आणि चंद्रपुर जिल्हातील भद्रावती ही दोन्ही ठिकाणं मातीच्या कलाकृती तयार करण्यासाठी एकमेकांना साहाय्य करण्यावर भर देत आहेत. ह्या दोन्ही ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या, रंगवलेल्या आणि काळ्या मातीच्या मनमोहक कलाकृती बनवतात. हाताने रंगवलेल्या ग्लेज टाईल्ससुद्धा बनवल्या जातात. भारतामध्ये मातीची भांडी आणि कलाकृती यांची एक समृद्ध परंपरा आहे आणि त्याची मुळे इतिहासपूर्व काळात आहेत.मातीच्या भांड्यांना एक विस्तृत सर्वव्यापकता आहे आणि त्याची परंपरा पाच हजार वर्षा पुर्वी पासुन आहे. टेराकोटा कलाकृतीच्या अत्यंत आकर्षक रुपामुळे ह्याला हस्तकलेला सुचलेले सुंदर काव्य असे म्हटले जाते. अनेक वैविध्यपुर्ण मातीच्या वस्तु बनवल्या जातात जसे, शोभेचे कंदील, सुरया, फुलदाणी,भांडी, संगीत वाद्ये, मेणबत्ती स्टॅंड इत्यादी. कच्चा माल :- जरुरी सामान – माती /चिकण माती, मोहरीचे तेल, कुंभाराचे चाक,गोंद,माड,मेण,काड्या,वाळलेली फांदी,पान,इंधन लाकुड,तांदुळाच्या काड्या,लाल माती, काळी माती,पिवळी माती,पिवळी चिकण माती,वेगवेगळ्या प्रकारची माती(चिकणमाती/चिखल),खायचा गोंद. सजावटीचे सामान – राख,शेण, भाताची साळ,चिकणमाती,रेती,फुनानफाडी(ओलं कापड), फुझेई(लाकडी मोगरी),खांगिखील,बंद भांड्याची पट्टी,लेपशुम(गोलाकार उभा ओटा), प्लास्टीक चिकण माती,मोहरीचे तेल,आरे चाक, खायचा डिंक माड, फेल्डस्पार खनिज, चिकणमाती, मेण. प्रक्रिया:- वेगवेगळ्या आकाराच्या वस्तु बनवण्यासाठी, हवा असलेला जरुरी आकार चाकावर ठेवुन देतात. काही भाग जसे नळ वा हॅडिल सोडुन देतात. त्यांना वेगळ्याने बनवुन मग जोडतात.त्यानंतर सजावटीसाठी त्याच्या पृष्ठभागावर भुमितीय प्रकारच्या आकृती कोरतात. चिकणमातीला राख आणि रेतीमध्ये मिसळुन पायाने मळतात, पायाने एकत्र करतात आणि तोडतात. नंतर पाटावर हाताने मळतात, आणि एक गोळा तयार करतात. सगळे घट्ट तुकडे काढुन टाकतात. आणि तयार गोळा चाकावर ठेवुन वेगवेगळे आकार बनवतात.भांडी बनवणा-या चाकाची गती कमी वेळाची असते,चाक एका लाकडी किंवा धातुच्या धु-यावर ठेवलेले असते, आणि एक फिरत्या टेबलाच्या पृष्ठभागासारखे काम करते. एक उभी काडी चाकाच्या छिद्राच्या कडेने लावलेली असते. कुंभार मातीचा गोळा चाकाच्या मध्यभागी काडीवर टाकतो,आणि चाक काडीने गोल फिरवतो. केंद्रापासुन दूर जाण्याच्या दबावामुळे मातीचा गोळा वरती आणि खाली ओढला जातो आणि भांडे बनते. ते एका तारेने बाहेर काढले जाते,वाळवुन त्याला भांड्यांच्या भट्टीत भाजले जाते.मातीच्या भांड्यांना साध्या उघड्या भट्टीमध्ये भाजतात, ह्या भट्ट्या कमी खर्चिक आणि उपयोगी असतात, त्याच्या मध्ये 700 ते 800 डिग्री सेल्सीअस तापमानापर्यंत उष्णता असते.मातीच्या भांड्यांना एका ओळीने एकावर एक रचतात. पानं आणि शेणाच्या गव-या कधी कधी जळणात टाकतात.मातीचा ढिगाला भाताच्या वाळलेल्या पेंढ्यांनी झाकतात, त्याच्या वर चिकण माती, रेती आणि इतर नैंसर्गिकरित्या विघटन होणा-या वस्तु, यांना एकत्र करुन केलेल्या मिश्रणाच्या पातळ परतीने आच्छादित करतात. आणि विस्तव लावुन चार ते पाच तास ठेवतात. काळी, लाल आणि पिवळी माती टेराकोटा कलाकृती बनवण्यासाठी वापरतात. ही माती राजस्थान आणि दिल्लीहून छोटया छोटया प्रमाणात मागवतात. या सामग्रीला निट मिसळतात, ओलावा राहु नये म्हणुन कडक उन्हात चांगले वाळवतात, त्यामुळे जरी ओलावा असला तरी तो वाफ बनुन उडुन जातो. नंतर ओल्या मातीच्या मिश्रणाला बारीक चाळणीतुन फेटुन त्यात असलेले खडे काढुन टाकतात. मातीला हाताने आकार देउन तयार केलेल्या वस्तुंना भट्टीत टाकुन भाजले जाते, जाळणासाठी ज्या वस्तु उपलब्ध असतील त्या वापरुन वस्तु भाजल्या जातात. उदाहरणार्थ शेणाच्या गोव-या, इंधन,लाकडाचा भुसा इत्यादी. चिकणमातीला राख आणि रेतीमध्ये मिसळुन पायाने मळतात, पायाने एकत्र करतात आणि तोडतात. नंतर पाटावर हाताने मळतात, आणि एक गोळा तयार करतात. सगळे घट्ट तुकडे काढुन टाकतात. आणि तयार गोळा चाकावर ठेवुन वेगवेगळे आकार बनवतात.भांडी बनवणा-या चाकाची गती कमी वेळाची असते,चाक एका लाकडी किंवा धातुच्या धु-यावर ठेवलेले असते, आणि एक फिरत्या टेबलाच्या पृष्ठभागासारखे काम करते. एक उभी काडी चाकाच्या छिद्राच्या कडेने लावलेली असते. कुंभार मातीचा गोळा चाकाच्या मध्यभागी काडीवर टाकतो,आणि चाक काडीने गोल फिरवतो. केंद्रापासुन दूर जाण्याच्या दबावामुळे मातीचा गोळा वरती आणि खाली ओढला जातो आणि भांडे बनते. ते एका तारेने बाहेर काढले जाते,वाळवुन त्याला मातीची भांडी भाजण्याच्या भट्टीत भाजले जाते.भाजल्यानंतर मातीच्या कलाकृती टेराकोटात बदलतात. तांत्रिक बाबी :- कुंभारकाम करणा-या महिला हाताने मातीला आकार देण्याच्या पद्धतीचा सराव करत आहेत, मागे वळुन पाहता, पाषाणयुगीन काळाच्याही पुर्वीची, कदाचित चाकाच्या शोध लागण्याच्या पुर्वी वापरली जाणारी ही पद्धत आहे. अशा पद्धतीने उत्पादित केलेल्या वस्तु आहेत सपाट तळाचे भांडे,पाण्याचा फिल्टर, फुलदाण्या, धूपदाणी,लँप,हुक्का. जायचे कसे :- जालना गांव हे राज्याची राजधानी आणि राष्ट्राची राजधानी यांना ब्राँड गेज रेल्वेमार्गाने जोडलेले आहे.राज्यातील प्रमुख शहरंसुद्धा राज्यमहामार्गाने जोडलेले आहेत.