एकाच भौगोलिक प्रदेशातील(शहर,गाव,वा त्याला जोडून असलेली खेडी किंवा जोडून असलेला प्रदेश) एकसारख्या वस्तुंचे उत्पादन करणा-या आणि समान संधी व दबावांना सामोरे जाण्या-या लोकांच्या समुहाला कामगार समुह म्हणतात.एका कारागीर समुहाची व्याख्या करायची झाल्यास, एकाच भौगोलिक प्रदेशातील(अधिक प्रमाणात गावं किंवा खेडयात) हस्तकला किंवा हातमागांच्या वस्तुंचे उत्पादन करणारे घरगुती समुह, अशी करता येईल. एक कारागीर समुह हा नेहमी एका पारंपारिक समुदायाशी संबंधित असतो आणि अशा स्थापित वस्तुंचे उत्पादन करणे हा त्याचा पिढीजात व्यवसाय असतो. आणि काही कारागीर समुह तर शतकांपासुन चालत आलेले आहेत. चाटोरी कारागीर समुहासंबंधी :- चाटोरी येथील कारागीर समुह महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यात येतात. चाटोरी येथिल कारागीर समुह हे 100 पर्यत कारागीर आणि 11 SHGs तयार करु शकले आहेत आणि ते जास्त कामाच्या दबावाला सामोरे जायला मदत करत आहेत. लाभाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. जरी, जरदोजी :- जे भरतकाम धातुच्या धाग्यांनपासुन केले जाते त्याला कलाबट्टु आणि जरीकाम म्हणतात. परभणी हे महाराष्ट्रातील प्रमुख जरी उत्पादन करणारे ठिकाण आहे. इथे धातुच्या तुकडयांना वितळवुन धातुची सळई बनविली जाते, त्याला पसा म्हणतात, ज्याच्या वर प्रकिया केल्यानंतर लांब सळई मिळते. ही सळई नंतर एक तार तयार करण्यासाठी छिद्र केलेल्या स्टीलच्या प्लेटमधुन ओढली जाते, त्याचसोबत तारकाशी प्रक्रियेने त्याला रबर आणि हि-याच्या ठप्प्याने बारीक केले जाते. प्रक्रियेच्या शेवटच्या पायरीला बाडला म्हणतात, जिथे तारेला सपाट करुन आणि मोडुन रेशमी किंवा कापसाच्या धाग्याबरोबर जोडून कसाब किंवा कलाबट्टु बनविल्या जातो. यात एकसारखेपणा, लवचिकता, मुलायमता आणि प्रतन्यता असते. कसाब हा खरं सोने आणि चांदी याचा तार असतो, तसेच उत्पादनाची किंमत कमी करण्यासाठी मुळतः तांबे असलेला आणि चांदी/ सोन्याचे वरुन पाँलीश दिले गेलेला तारही असू शकतो. जरीचा धागा हा कपडा विणण्यासाठी जास्तप्रमाणात आणि भरतकामासाठी निवडक प्रमाणात वापरला जातो. जटिल बारीक डिझाईनसाठी गिजरी किंवा बारीक कडक तार वापरली जाते, सितारा नावाचा, एक छोटा धातुचा चांदणीचा आकार फुलाच्या डिझाईनसाठी वापरला जातो. या प्रकारच्या भरतकामाला सलमा – सितारा म्हणतात. जाड कलाबट्टु हा सोन्याचा गुंफलेला धागा असतो, याचा वापर कपडयाच्या किना-यावरच्या डिझाईन्स साठी करताता, तर यातील बारीक प्रकारचा धागा बटवा आणि पर्सच्या तसेच रेशमी गुच्छ आणि नेकलेसच्या धाग्या मध्ये कसण्याच्या नाडीसाठी करतात. टिकोरा एक सोन्याचा धागा असतो जो स्प्रिंगसारखा वळलेला असतो त्याने क्लिष्ट डिझाईन्स काढले जातात. निस्तेज जरीच्या धाग्याला कोरा म्हणतात आणि थोड्या जास्त चमकणा-या धाग्याला चिकणा म्हणतात. एक आयाताची लाकडी चौकटीचे उपकरण जे भरतकामासाठी वापरले जाते त्याला कारचोब म्हणतात आणि एका लाकडी पायाला थापा म्हणतात ज्याचा वापर लेस शिवण्यासाठी करतात. खाली वेगवेगळ्या प्रकारच्या जरीकामाची यादी दिली आहे. जरदोजी :- भरतकामाचा ह्या प्रकारात कपडयावर भारी आणि जास्त सजावट केली जाते, यात वेगवेगळ्या त-हेचे सोनेरी धागे, सितारे, मणी, छोटे मणी, तार आणि गोटा वापरला जातो. या प्रकारचे भरतकाम लग्नाच्या कपडयांना, जड कोट, उश्यांचे अभ्रे, पडदे, शामियाना, प्राण्यांची झुल, पिशव्या, पर्सेस, पट्टे आणि जोडे यांना सजविण्यासाठी केले जाते. हे भरतकाम सिल्क, वेलव्हेट आणि सँटीनच्या कपडयावर केले जाते. यात वापरले जाणारे भरतकामाचे टाके टाके आहेत सलमा – सितारा, गिजाई,बडला,कटोरी आणि सजावटीच्या दुस-या प्रकारात छोटे मोती वापरले जातात. जरदोजीचे काम करणारे प्रमुख ठिकाणं आहेत दिल्ली, जयपुर, बनारस, आग्रा, आणि सुरत. वयस्कर लोक तरुणांना शिकवतात आणि ही परंपरा पिढ्यान पिढ्या चालते आहे. कामदानी :- हे हलक्या कपडयावर जसे मोठा रुमाल, ओढणी, आणि टोपीवर सुईने केले जाणारे काम आहे. साधा दोरा वापरला जातो आणि तार शिवणाने खाली दाबुन एक सँटिन शिवणीचा परिणाम निर्माण केला जातो. याने कपडयावर एक चमक दिसते आणि त्याला हजार बत्ती ( हजारो दिवे ) असे म्हणतात.मीनाकाम :- हे काम धातुच्या मीनाकामासारखे असल्यामुळे याला हे नाव पडले आहे. हे भरतकाम सोन्यानी केले जाते. कांटोकी बेल :- हा कपडयाच्या किनारीसाठी केला जाणारा भरतकामाचा प्रकार आहे. यात एका कडक कँनव्हासचा पुर्ण पृष्टभाग कडेवर सितारे लावुन भरण्यात येतो. या किनारीसाठी वेगवेगळ्या डिझाईनचे प्रकार वापरण्यात येतात जसे जाळीची लेस बनविण्यात येते आणि त्याला जरीच्या टाक्याने आणि सिता-याने भरण्यात येते. माकाईश : - हा भरतकामाचा सर्वात जुना प्रकार आहे आणि चांदीच्या तारेने किंवा बडलाने केला जातो. यामध्ये तार हीच सुईचे काम करते, कपडयाला तारेने टोचुन टाके पुर्ण केले जातात. डिझाईन्स चे वेगवेगळे प्रकार या भरतकामाद्वारे निर्माण केले जातात. टिला किंवा मारोरी काम : - या प्रकारच्या भरतकामात सोन्याचा धागा सुईच्या साहाय्याने कपडयाच्या पृष्टभागावर शिवला जातो. गोटा काम :- विणलेली सोन्याची किनार वेगवेगळ्या आकारात कापुन विविध प्रकारच्या संरचना डिझाईनसाठी बनविल्या जातात. जयपुरमध्ये साडीची किनार किंवा कपडा वेगवेगळ्या आकारात जसे पक्षी, प्राणी, आणि मानवी आकृत्यात कापुन त्याला कपडयावर जोडुन आणि त्याला चांदीच्या किंवा सोन्याच्या तारेनी झाकतात.त्याच्या भोवताल रंगबिरंगी सिल्कचा धागा असतो. हे काम मीनाकामासारखे दिसते. किनारी काम : - हा एक थोडा वेगळा प्रकार आहे,यात केवळ कपडयाच्या किनारीवर सजावट केली जाते, एका लटकलेल्या गुच्छासारखी. हे काम प्रामुख्याने मुस्लीम समुदायाचे पुरुष किंवा बायकांद्वारे केले जाते. कच्चा माल :- प्रामुख्याने वापरला जाणारा आधारभूत कपडा : - रेशमी कपडा, जरी, काँटन, पाँलिएस्टर, जँक्वायर्ड हातमाग; दोरा ( धागा; 80 नंबर/60 नंबर, मर्सिराईज धागा 30 नंबर) सजावटीचे सामान : - मोराचे पिस रंगाचे सामान : - बुकानी ( रंगाची भुकटी) प्रक्रियाः-: ज्या प्रकारचे संरचनेचे डिझाईन विणायचे असेल ते प्रथम पेपरवर काढतात. नंतर डिझाईन कापसाच्या दो-यावर टिल्लीच्या साहाय्याने गुंडाळुन आणि ग्रिडवर (जाळी) भरुन हस्तांतरीत केले जातात. या मशीनला जाळे म्हणतात. ज्यामध्ये पुर्ण आकृत्यांच्या संरचना असतात. हे जाळे हातमागाच्या वर टांगलेले असतात आणि गुंडाळलेल्या दो-यांशी बांधलेले असतात, आणि नियंत्रित केलेले गुंडाळलेले दोरे केवळ जसे डिझाईन असेल त्याप्रमाणे उचलले जातात. जास्तीचे गुंडाळलेले जरीचे/ रेशमी धागे हे उठलेल्या भागात ओळी ओळीने गुंडाळलेल्या धावत्या धाग्याबरोबर घुसविलेले असतात. आज जाळे उपकरणाच्या जागी कार्डोसन छेदक यंत्र वापरले जाते आहे; ह्या जरीच्या सजावटकामासीठी जँकर्वड हातमाग वापरला जातो. ग्यासार; तिबेटीयन विणलेले प्रकार हे खुप जवळ दाट विणीचे असतात. रेशमी/जरीच्या दो-याशिवाय मोरपिसाचा वापर सँटिन विणीत करतात, सर्व पृष्ठभाग पिसांचा बनवायला. डिझाईनचे नमुने हे गडद लाल, पिवळ्या, निळ्या आणि पांढ-या सँटीनच्या भागावर चांदी आणि सोन्याची जर वापरुन विणतात. तांत्रिक बाबी :- कपडा जोडणे आणि कापणे पद्धतीने भरतकाम:- सामान्यतः उत्कृष्टतेने काढलेला पांढ-या कापसाचा दोरा चिकन भरतकामासाठी वापरतात.काही टाके हे कपडयाच्या वरच्या बाजुने भरतकाम करतात आणि काही टाके कपडयाच्या मागच्या बाजुने भरतकाम करतात आणि कपडयाच्या समोरुन डिझाईन तयार होते. शिला पै हीने तिच्या पुस्तकात पुस्तकात लिहले आहे कि चिकन भरतकामात सहा मुळ टाके आहेत, ज्याचा संयुक्तपणे वापर करुन फुलं आणि पानांचे उठावदार काम केले जाते. जाळी काम चिकनकामाच्या या प्रकारात दो-याने बारीक जाळी तयार करतात ( जशी छिद्रित जाळीची खिडकी, ज्याच्यातुन बाहेर पाहता येते पण बाहेरुन आतले दिसत नाही) आणि खाटाओ( एक जोडणे आणि कापण्याची पद्धती, ज्यात कपडयाचे तुकडे हेमिंग करुन दुस-या कपडयाच्या तुकडयाला जोडतात आणि नंतर कापुन काढुन टाकतात, आणि उरलेल्या तुकडयाच्या बारिक रेषेचे डिझाईन तयार होते.) जायचे कसे :- सर्वात जवळचे विमातळ औरंगाबाद ( 198किमी.) आहे, ते मुंबईशी थेट जोडलेले आहे. पुणे हे दुसरे जवळचे विमानतळ आहे. परभणी हे रेल्वेमार्गाने ( ब्राँड गेज) जोडलेले एक प्रमुख रेल्वेस्टेशन आहे.परभणी जिल्हामुख्यालय हे राज्यमाहामार्ग आणि रस्तेमार्ग याने सर्व नऊ तालुके( उपजिल्हे) आणि प्रमुख शहरं यांना जोडलेले आहे. पुणे 379 किमी. आणि मुंबई 516 किमी. परभणी दूर आहे.