एकाच भौगोलिक प्रदेशातील(शहर,गाव,वा त्याला जोडून असलेली खेडी किंवा जोडून असलेला प्रदेश) एकसारख्या वस्तुंचे उत्पादन करणा-या आणि समान संधी व दबावांना सामोरे जाण्या-या लोकांच्या समुहाला कामगार समुह म्हणतात. एका कारागीर समुहाची व्याख्या करायची झाल्यास, एकाच भौगोलिक प्रदेशातील(अधिक प्रमाणात गावं किंवा खेडयात) हस्तकला किंवा हातमागांच्या वस्तुंचे उत्पादन करणारे घरगुती समुह, अशी करता येईल. एक कारागीर समुह हा नेहमी एका पारंपारिक समुदायाशी संबंधित असतो आणि अशा स्थापित वस्तुंचे उत्पादन करणे हा त्याचा पिढीजात व्यवसाय असतो. आणि काही कारागीर समुह तर शतकांपासुन चालत आलेलेआहेत.बीडच्या कारागीर समुहाची माहिती :-बीडचे कारागीर समुह महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात येतात.बीड जिल्ह्यातील कारागीर समुह हे 300 पर्यंत कारागीर आणि 33 स्वयं सहाय्ता सामुह तयार करु शकले आहेत आणि ते सर्व जास्त कामाच्या दबावाला सामोरे जायला मदत करीत आहेत. लाभाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे.भरतकाम -:शिवाजी महाराजांची ही भुमी कसुती भरतकामासाठी प्रसिद्ध आहे. ही कलाकारी प्रामुख्याने साडीवर करण्यात येते, जो महाराष्ट्रीय बायकांचा पारंपारीक पेहराव आहे.होलबेन लहरीया पँटर्न आणि आडवे तिरप्या शिवणी हे प्रमुख टाके या भरतकामात वापरले वापरले जातात. आज ह्या प्रकारचे भरतकाम जवळपास सर्व प्रकारच्या वस्तुंवर पाहण्यात येते जसे सलवार सुट, मोठे रुमाल(स्टोल) पर्स, छोट्या हात पर्स इत्यादी. बाजारातील मागणी पाहता, इतर उत्पादनं जसे चटया,चादरी,पडदे आणि इतर विविध प्रकारच्या वस्तुंवरसुद्धा भरतकाम करण्यात येत आहे.भरतकामाची व्याख्या करायची झाल्यास, भरतकाम म्हणजे सुईच्या साहय्याने कपडयावर विविधरंगी धाग्यांचे शिवणकाम करुन कपडयाला अलंकृत करणे किंवा शोभादायक वस्तुं त्यावर लावुन सजवणे होय. अशाप्रकारे भरतकाम म्हणजे कपडयावर सुई आणि धाग्याचा वापर करुन कपडयाला सजवणे आहे. महाराष्ट्रातील भरतकामाला त्याच्या कारागीरांच्या सृजनशीलतेच्या प्रतिभेमुळे प्रसिद्धी प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रातील कारागीर वस्तुंना सजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टाक्यांचा वापर करतात. महाराष्ट्रातील भरतकाम करणारे सर्वात प्रमुख केंद्र बीड जिल्ह्यात आहे, आणि तेथील कारागिरांच्या श्रेष्ठ सृजनतेची स्तुती करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील भरतकाम हे काही दुस-या समुदायांसाठी, उत्पन्नाच्या स्त्रोतांपैकी एक प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत आहे. जरी भरतकाम ही कपडयांना सजवण्याची सर्वात पारंपारिक पद्धत असली तरी आजही तेवढीच लोकप्रिय आहे.जुने पारंपारिक डिझाईन्स असो किंवा आजच्या माँडर्न काळातील नविन भुमितीय रचना असो, पण हेच भरतकाम, कपडयाला सजवण्यासाठी सामान्यताः वापरल्या जाणा-या मार्गांपैकी, एक प्रमुख मार्ग राहणार आहे. वस्तुताः विशेषज्ञांना असे वाटते की आजच्या काळात सृजनशिलता आणि नवनिर्माण यांना विकासाची जास्त संधी प्राप्त आहे, कारण समाजाची नविन बदल स्विकार करण्याची मानसिक पातळी वाढलेली आहे.महाराष्ट्रातील आरी भरतकामाला त्याची स्वतःची एक, अशी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ प्राप्त आहे. नायजेरीयातील बायका(समारंभाच्या काळात) इथले भरतकाम केलेले कपडे घालतात.या कपडयावर टिकल्यांचे आणि मण्यांचे भरतकाम केलेले असते, जे त्यांना आकर्षक बनवते.या प्रकारचे भरतकाम कपडा लाकडी चौकटीत बसवुन करतात. कपडयावर लांब सुईच्या साहाय्याने धागे,टिकल्या आणि मणी लावुन भरतकाम केले जाते.वेगवेगळ्या आकाराच्या चौकटी बनवल्या जातात, सामान्याताः ज्या कपडयावर स्टेनसिलने डिझाईन रेखाटायचे असते त्याला सुरक्षित करण्यासाठी 1.5 फुट उंचीच्या चौकटी बनवल्या जातात. एका हाताने कपडयाच्या खालच्या दो-याला सुईद्वारे, न गुंतता निट वर यावा म्हणून पकडले जाते, त्याच वेळी दुस-या हातने कपडयावर सुई सहजरीतीने फिरवून डिझाईन दो-याने भरण्यात येते.सजावटीसाठी कपडयावर टिकल्या आणि मणी सुईने जोडले जातात.भरतकामाचा एक दुसरा प्रकार जाळी किंवा नेट भरतकाम आहे.या प्रकाराने फुलांचे किंवा भुमितीय आकृतींचे डिझाईन कढले जाते.हे डिझाईन काढण्यासाठी गुंडाळलेल्या आणि ताणुन विणलेल्या दो-यांच्या जाळीला ओढुन बारीक बटनहोल टाक्याने कपडयावर जोडले जाते. तयार झालेल्या उत्पादनांमध्ये प्रामुख्याने घरगुती वस्तुंचा समावेश आहे, जसे पडदे, पलंगावर घालायचा शोभीवंत कपडा, फर्निचरांवरचे आच्छादनं, कपडे इत्यादी. वापरला जाणारा कच्चामाल :-लांब सुई, धागे, टिकल्या आणि मणी यांच्या सहाय्याने कपडयावर काम केले जाते. ज्या कपडयावर स्टेनसिलने डिझाईन रेखाटायचे असते त्याला सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या लाकडी चौकटी बनवल्या जातात. सामान्याताः 1.5 फुट उंचीच्या चौकटी बनवल्या जातात. एका हाताने कपडयाच्या खालच्या दो-याला, सुईद्वारे निट वर यावा म्हणून सुरक्षिततेने पकडले जाते, त्याच वेळी दुस-या हातने कपडयावर सुई सहजरीतीने फिरवुन भरतकाम करण्यात येते.प्रक्रियाः-भरतकाम ह्या हस्तकलेत फार तांत्रिक प्रक्रिया नाही आहेत,तरीपण काही छोट्या प्रक्रिया लक्षपुर्वक कराव्या लागतात जसे :- 1.डिझाईनच्या नमुन्याला ट्रेसींग कागदानी ट्रेस करुन सममितीय आकृत्या आणि एकसारखे डिझाईन बनवले जातात, जसे खाका. 2.कपडयावरच्या डिझाईनच्या नमुन्यावर भरतकाम करण्यासाठी मार्किंग शाई लेखणी ने चिन्हांकित केले जाते. 3.आता या चिन्हांकित कपडयाला चारही बाजुने अतिशय घट्टरित्या ताणून (साडी, कपडा,इत्यादी) लाकडी चौकटीवर बसवतात( कधी कधी भरतकाम चौकटी शिवाय ही करतात). 4.चौकटी चा वापर करुन भरतकाम करणे सोपे होते. त्यानी कपडयावर वळ्या पडुन डिझाईन खराब होउ शकण्याचा तणाव कमी होतो. 5.हवे असलेले डिझाईन्स चे नमुने मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टाके (पाक्का,कच्चा,सोफ,राबरी,खारीक) सुबकपणे वापरुन भरतकाम कले जाते. 6.आणि परिणामस्वरुप विविध रंगाचे सुंदर डिझाईन दिसतात आणि बनवायला सोपे असतात.कपडयाला ( साडी, ड्रेस, कपडे इत्यादी.) लाकडी चौकटीवर (भरतकाम चौकटी शिवाय ही करता येते) डिझाईन्स नुसार हव्या असलेल्या कोनात ठेवुन घट्ट बसवा. डिझाईनच्या नमुन्यांसाठी, सममितीय आकृत्या आणि एकसारखे डिझाईन बनवण्यासाठी ट्रेसींग कागदानी ट्रेस करा, उदाहरणार्थ खाका डिझाईन.कपडयावरच्या डिझाईनच्या नमुन्यावर भरतकाम करण्यासाठी तरल स्वरुपातली मार्किंग शाई लेखणी ( राँकेल आणि गाली भुकटी) वापरुन चिन्हांकित करा आणि भरतकामाची प्रक्रिया करताना, हवे असलेले डिझाईन्स चे नमुने मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टाके सुबकपणे वापरुन भरतकाम करावे लागते. काही भरतकामाच्या डिझाईन्समध्ये छोटे गोल आरसे, वस्तुंना किंवा कपडयाला बटनहोल टाक्याने जोडुन बनविले जातात. या आरश्याची बाह्यरेशा हाताने चिन्हांकित करतात. रेशमी धाग्याने या बाह्यरेशेच्या जवळ स्टीम किंवा हेरिंगबोन टाका वापरुन भरतकाम करतात. गडद रंगाच्या पार्श्वभुमीवर फुल आणि लतावेलांचे आकार काढतात.तांत्रिक बाबी :-भरतकामासाठी वापरल्या जाणा-या तांत्रिक बाबी या वेगवेगळे संप्रदाय आणि प्रदेश यानुसार बदलत असतात. भरतकामाची व्याख्या करायची झाल्यास, भरतकाम म्हणजे सुईच्या साहाय्याने कपडयावर विविधरंगी धाग्यांचे शिवणकाम करुन कपडयाला अलंकृत करणेकिंवा शोभादायक वस्तुं त्यावर लावुन सजवणे आहे. अशाप्रकारे भरतकाम म्हणजे कपडयावर सुई आणि धाग्याचा वापर करुन त्याला सजवणे आहे. भरतकामासाठीहात आणि मशीन दोन्ही पद्धतीचा वापर करतात, पण आजच्या तारखेतही हाताने भरतकाम जरी ते खर्चिक आणि वेळखाउ असले तरी जास्त स्वरुपात करण्यात येते. हातने भरतकाम करणे जास्त श्रेयस्कर मानल्या जाते, याचे कारण आहे हस्तकलेशी जटीलतेचा असलेला जवळचा संबंध.भरतकामसाठी वापरल्या जाणा-या मुलभूत पध्दती आहेत :- 1.तिरपा टाका2.भरीव काम 3.पॅच वर्क किंवा रजई बनविणेजायचे कसे :-हवाईमार्ग :-औरंगाबाद सर्वात जवळचे विमानतळ.रस्तामार्गे :-बीड पासुन खुप बसेस उपलब्ध आहेत.रेल्वेमार्गे :-औरंगाबाद जवळचे परळी बैजनाथ सर्वात जवळचे रेल्वेस्थानक आहे.